
आनंद वीर(प्रतिनिधी)प्रा.हाके,वाघमारे यांच्या उपोषणाचा दहावा दिवस असून सरकारच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्रीत उपोषणस्थळी भेट दिली.यात 5 मंत्र्यांसह 12 नेत्याच्या समावेश होता.मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यासह जवळ जवळ सर्वच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले त्यानंतरच हे उपोषण तात्पुरती स्थगीत करण्यात आले.मंत्री छगन भुजबळ, धनजय मुंडे,गिरीश महाजन,अतुल सावे,गुलाबराव पाटील, उदय सामंत,प्रकाश शेंडगे यांच्या शिष्टमंडळाच्या हस्ते पाणी पिऊन उपोषण सोडण्यात आले.बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार तसेच सगे सोयाऱ्याचे आरक्षण देणार नाही असे आश्वासन सरकारने दिल्याने आंदोलन,उपोषण तात्पुरती स्थगित करण्यात आले.