
मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलै पर्यंत सागे-सोयरे बाबद अंमलबजावणी करून सर्व मराठा समजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.ओबीसी नेत्यांनी कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला असून सरकारने दबावाखाली बोगस प्रमाणपत्र वाटप केले असल्याचा आरोप करत ते बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे.त्यावर मनोज जरांगे हे चांगलेच संतापले असून एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द केले तर पुढील आंदोलन हे मंडळ आयोग रद्द करण्यासाठी असेल त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा मनोज जारंगे यांनी दिला आहे.