
बीड लोकसभेच्या निवडणुकीआधी प्रचारासाठी गेलेल्या नेत्यांना मराठा आरक्षण प्रश्र्नी मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होते.गावोगावी प्रचारासाठी गेलेल्या नेत्याना,उमेदवारां समोर घोषणाबाजी केली जात होती. लोकसभेचा निकाल लागल्यावर देखील घोषणाबाजीचे वारे काही कमी होताना दिसत नाही.काल बीड चे आमदार संदीप क्षीरसागर हे चौसाळा तालुक्यात विविध विकास कामे शुभारंभ, करण्यासाठी तसेच अंजनवती येथे ३३/११ केव्ही विद्युत केंद्राचा शुभारंभ करण्यासाठी गेले होते.तेथून जवळ आलेल्या हिंगणी गावात गेले असता त्यांच्या वाहनाच्या समोर जमावाने घोषणा देण्यात आल्याने नेत्यावरचा रोष कमी होताना दिसत नसल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे.