विधानसभा ची तैयारी ४ राज्यात मतदार याद्या अद्यावत करणार.

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीसाठी मतदार नोंदणी ई. प्रक्रिया चालू केली आहे. त्या नुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्या दिनांक 25 जून 2024 ते दिनांक 25 जुलै 2024 या कालावधीत अद्ययावत होणार आहेत.दिनांक 25 जुलै 2024 रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर होणार आहेत. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
लोकसभा निवडणूक दरम्यान जे घोळ झाले ते लक्षात घेता सर्वांनी सजग बनून आपले नाव आहे की नाही याची खातरजमा करावी. नसेल तर या कालावधीत फॉर्म नंबर 8 for update only भरण्यात यावा. जो पर्यंत आपण सजग बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग to be granted attitude सोडणार नाही. नंतर चर्चा करण्यापेक्षा आता थोडेसे सजग बनून ज्यांची नावे गायब झाली त्यांनी ती नावे परत कशी येतील याकडे लक्ष द्यावे.अधिक माहितीसाठी आपल्या भागातील जिल्हाधिकारी/महानगरपालिका /नगरपालिका /तहसीलदार /ग्रामपंचायत /तलाठी ई. अथवा राजकीय पक्षाच्या कार्यालयाशी निवास स्थानाच्या पुराव्यासह त्वरित संपर्क साधावा.