
आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेट चे चेअरमन सुरेश कुटे सह संचालक मंडळावर फसवणुकीचे विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून सुरेश कुटे हे गुन्हे आर्थिक शाखा पुढील तपास,चौकशी करण्यासाठी कुटे पोलिसांच्या ताब्यात आहेत.आता वडवणी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.ठेवीदारांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने सुरेश कुटे,अर्चना कुटे,यशवंत कुलकर्णी,युवराज शिंदे सह संचालक मंडळावर ठेवीदार गोरख अण्णासाहेब मुंडे यांनच्या फिर्यादीवरून क.420,406,409,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन सिरसाट करत आहेत.