
आनंद वीर (प्रतिनिधी) वडवणी शहरातून दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरीस गेल्याने चोरावर पोलिसाचा धाक न राहिल्याचे दिसत आहे.साळींबा गावातील दत्तात्रय जाधव हे वडवणी शहरातील दुकानं मध्ये कामास आहेत.त्यांनी आपली मोटरसायकल क्रं.MH 44 W 5314 दुकानच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लावून कामावर गेले असता अज्ञात चोरट्यांनी हँडल लॉक तोडून मोटर सायकल घेऊन पसार झाले.ते दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरे झाले असून वडवणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.वडवणी पोलिस पुढील तपास करत आहेत.जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनेेत वाढ झाल्याचे दिसत आहे.