
वीर(प्रतिनिधी) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तूतारी वाजणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यावर लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी तुतारी व पिपाणी हे चिन्ह एकच असल्याचे समजून दोन जाग्यावर पराभव स्वीकारावा लागला.बऱ्याच जागेवर पिपाणी या चिन्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मत मिळाली.त्यामुळे शरद पवार गटाला पिपाणी चा फटका बसल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पिपाणी हे चिन्ह निवडणूक यादीतून वगळावे अशी मागणी केली आहे.पिपाणी या चिन्हामुळे मतदारात संभ्रह निर्माण झाला होता.आमच्या मागणीचा विचार केला नाही तर सुप्रीम कोर्टात दाद मागितली जाईल असे पवार म्हणाले.