
- आनंद वीर(प्रतिनिधी) ठेवीदारांची फसवणूक केल्याने ज्ञानराधा चे सुरेश कुटे यांना शिवाजीनगर पोलीसानी अटक केली असता आज बीड न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी आणखी माहितीसाठी सहा दिवसाच्या pcr मागवला असता न्यायालयाने कुटे यांचा तीन दिवसांचा पीसीआर देण्यात आला त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी कोठडीत रवानगी केली आहे. यावेळी बीड न्यायालयात ठेवीदार मोठ्या संख्येने जमा झाले होते, त्यामुळे पोलिसांनी कुटे ना मागच्या दाराने व्हॅन मध्ये बसून नेले.कुटे ना ताब्यात घेण्यासाठी बीड न्यायालयात पैठणचे पोलीस देखील दाखल झाले होते.