
वीर(प्रतिनिधी)NEETच्या घोटाळ्यामध्ये आरोपी शिक्षकाकडे बीडचे 7 विद्यार्थ्यांचे हॉलटिकीट सापडल्याने बीडचे नाव घोटाळ्यात समोर येऊ लागले आहे.विषय बाब म्हणजे हे सर्व शिक्षक आहेत.यांची मुले लातूरला खाजगी क्लासेस मध्ये शिकवणीसाठी आहेत.काल या पालकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले असता 550 पेक्षा जास्त गुण देणार असल्याने आमच्याकडुन जलील पठाण,संजय जाधव यांनी चार ते पाच लाख रुपये देऊन सुद्धा तेवढे गुण मिळाले नसल्याची माहिती त्या पालकांनी दिली आमची फसवणूक झाल्याची पालकांनी चौकशीत सांगितले. त्यानंतर त्यांना सोडून दिले परंतु त्यांना आता साक्षीदार करण्यात येणार आहे.सतीश पवार,देविदास जाधव,राजेश पवार,शामराव राठोड यांना लातूर पोलिसांनी चौकशीत बोलवले. त्यामुळे आता बीडचे हे नाव नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यात पुढे येऊ लागले आहे.