ताज्या घडामोडी
मनसे चे रस्त्यासाठी सरण रचो आंदोलन
रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे,नसत मनसे स्टाईल आंदोलन

वीर(प्रतिनिधी) बीड शहरात बऱ्याच भागात रस्त्यावर खड्डे पडल्याने शहरवासीय वैतागले असून याकडे नगर पालिकेकडून जानीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे चे शहर अध्यक्ष करण लोंढे यांनी केला आहे.शहरातील संत सावतामाळी चौक,जिजामाता चौक, अमरधाम स्मशानभूमी ते जुना मोंढा जोडणाऱ्या या रस्त्यावर कित्येक वर्षापासून खड्डे पडले पुलावरील गज देखील उघडे असून अपघात होवून गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.यापूर्वीही आंदोलन झाली होती परंतु जाणीवपूर्वक हा रस्ता केला जात नसल्याने आज मनसे कडून सरण रचो आंदोलन करण्यात आले.यानंतर चे आंदोलन हे मनसे स्टाईल होईल असा इशारा दिला.यावेळी शहराध्यक्ष करण लोंढे,राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे, उपाध्यक्ष कुणाल उगले,सचिव सोमेश कदम,हिराबाई कांबळे,ओम पारवे,प्रतिक लोळगे सह मनसैनिक उपस्थित होते.