
वीर( प्रतिनिधी) बीड पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांची बदली आज बीड पोलिस अधीक्षकानी केली.साबळे हे काही महिन्यांपासून वादग्रस्त करत चालले होते.बीड जाळपोळ प्रकरणातही त्यांनी काहीच ॲक्शन घेतली नव्हती.बीड जिल्ह्यात घरफोडी,चोरी,मारामारी,दरोडा, दुचाकी चोर यावर कसलंही अंकुश राहिला नव्हता.त्यामूळे साबळे हे वादग्रस्त ठरतं होते.कोणत्या गुन्ह्यातील आरोपीकडून खूप मोठ मोठ्या पैशांच्या डील झाल्याचे याच डिपार्टमेंट मधील काही कर्मचाऱ्याकडून बोलले जात होते.त्यामुळे साबळे यांच्या कार्यावर प्रश्न निर्माण झाले होते.साबळे यांची बदली केल्याने जास्त काही फरक पडणार नाही, या शाखेत वर्षानुवर्ष असलेल्यांची पण बदली करायला हवी.आर्थिक गुन्हे शाखेचे खाडे हे एक कोटी रुपयाची लाच मागितल्याने एसीबीच्या जाळ्यात अडकले होते त्यामुळे या आर्थिक गुन्हे शाखेची बदनामी जास्त झाली होती.साबळे यांनच्या जागी परळी पोलिस निरीक्षक येण्याची शक्यता आहे.