वडीलांच्या उत्तर कार्य प्रसंगी पाहुण्यांना भोजना बरोबर दिले आंब्याचे रोपटे
शिक्षक मुलाचा दु:खातही प्रेरणादायी उपक्रम!

शिरूरकासार : अशोक भांडेकर
वडीलांचे पितृछत्र हरवणे आणि ते देखील चालता बोलता हे दु:ख कोणालाही असह्य असते मात्र नियती पुढे सर्वच हतबल होत असतात परंतू अशाही परिस्थितीत त्यांची आपल्यासह पाहुण्यांना देखील कायम स्वरूपी स्मृती राहवी म्हणून वडीलांच्या उत्तर कार्य प्रसंगी भोजना बरोबर प्रतेक पाहुण्याच्या पत्रावळीवर एक आंब्यांचे रोपटे देऊन शिक्षक मुलाने प्रेरणादायी उपक्रम राबवला .
शिरुर कासार तालुक्यातील आर्वी येथील सुधाकर दगडू कुंभारकर या बांगडी व्यावसाईकाचे अकस्मात निधन झाल्याने कुटूंब दुःखी झाले ,परंतू त्यांचा दशक्रिया विधी व उत्तर कार्य करतांना हे दु:ख पाठीशी ठेऊन अन्य वस्तू वाटप करण्या ऐवजी वडीलांची आठवण कायम स्वरूपी राहावी हा उद्देश समोर ठेऊन मदन सुधाकर कुंभारकर या मुलाने पाहुण्यांना भोजना बरोबर स्मृतीभेट म्हणून आंब्याचे जवळपास शंभर रोपटे देऊन पितृऋण कायम ठेवण्याचा उपक्रम राबवला या उपक्रमाचे सर्वांनी कौतूक तर केलेच परंतू आंबा रोपट्याचे संगोपन करण्याचा संकल्प देखील केला .