
वीर(प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील चकलांबा या गावात महिला शेतात खुरपणी करत असताना अचानक वीज कोसळल्याने तीन महिला ठार झाल्या असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.1)विजया राधाकिसन खेडकर वय 45 वर्ष,2)लंका हरिभाऊ नजन वय 52 वर्ष,3)शालनबाई शेषेराव नजन या महिला शेतामध्ये काम करत असताना साडेपाचच्या सुमारास अचानक वीज पडल्याने तिन महिला ठार झाले असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.