
वीर(प्रतिनिधी) दोन दिवसापूर्वी वडवणी शहरातील एसबीआय बँकेतील मॅनेजर पाटील यांना मुंडे नामक व्यक्तीने मारहाण केली होती.चुकीच्या फाइलवर सह्या न केल्याने हि मारहाण झाली होती अशी तक्रार वडवणी पोलीस ठाण्यात दिली आहे.आरोपींना तात्काळ अटक करून अटक करून बँक कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी आज एसबीआय क्षेत्रीय कार्यालय मुख्य शाखा येथून सर्व अधिकारी व कर्मचारी निषेध रॅली काढून जिल्हाधिकारी बीड व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन आरोपी अटक करावी अशी मागणी केली.