
वडवणी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकास कर्ज प्रकरणी मारहाण करण्यात आली होती याचे पडसाद आज जिल्हाभरात उमटले. जिल्ह्यातील सर्व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा सकाळपासून बंद ठेवण्यात आल्या यामुळे पीक विमा व इतर महत्त्वाच्या कामासाठी बँकेत येणाऱ्या शेतकरी व नागरिकांचे तसेच जेष्ठ नागरिकांचे हाल झाल्याचे पहावयास मिळाले.