ताज्या घडामोडी
शिवसेना जिल्हाप्रमुखांनीच पंकजा मुंडेना दिला धोका
कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

वीर(प्रतिनिधी) बीड लोकसभा निवडणूकीचा निकाल काय लागेल याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यावेळच निवडणुकी जातीय समीकरणावर झाली असून यात खूप मोठ्या प्रमाणात जातीवाद पेरला गेला. अटीतटीच्या लढतीमध्ये पंकजा मुंडेचा अल्पमताने पराभव झाला.हीऑडिओ क्लिप निकाल जाहीर होण्याच्या आधीची आहे.बीड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची ऑडिओ क्लिप आज व्हायरल झाली असून त्यांनी सांगितले की मी पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांना धोका दिला असून बजरंग बप्पा सोनवणे यांचे काम केले.त्यामुळे बीड राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून प्रचारात सोबत फिरणाऱ्यांनीच पंकजा मुंडे यांचा घात केल्याचे,धोका दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.