
- गेवराई तालुक्यातील सिरसदेवी फाटा येथील जय हनुमान सायकल मार्ट समोर शंकर बाबुराव सुगडे रा. रुई ता. गेवराई या तरुणावर रुई गावातील सुग्रीव हरिचंद्र तळेकर, बाळू अरुण नवले या दोघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटात, बरगडीवर, छातीवर, पाटीवर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
- सविस्तर माहिती अशी कि, तालुक्यातील
- सिरसदेवी फाटा येथे दि. 20/06/2024 रोजी संध्याकाळी 7:00 वाजण्याच्या सुमारास शंकर सुगडे आणि त्याचा मित्र सिद्धेश्वर सागडे व साहेबराव पवार असे हे सर्व सिरसदेवी फाटा येथील जय हनुमान सायकल मार्ट समोर बसलेले असताना सुगडे यांच्या गावातीलच रहिवासी असलेले सुग्रीव हरिचंद्र तळेकर आणि बाळू अरुण नवले हे सुगडे यांच्या जवळ आले म्हणाले तू लई माजलास तुज्याकडे बगतो असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यानी मारहाण करून सुग्रीव यांनी त्याच्या खिशातील चाकू काढला आणि जीव घेण्याच्या उद्देशाने अंगावर सपासप करून गंभीर जखमी केले असता सागडे व साहेबराव यांनी शंकर सुगडे यांना तात्काळ बीड येथील माऊली हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.तसेच याप्रकारणी तलवाडा पोलिस स्टेशनं येथे सुगडे यांच्या जवाबावरून सुग्रीव तळेकर आणि बाळू नवले यांच्या विरुद्ध 307,326,323,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपीना तलवाडा पोलिसांनी अटक केले आहे.
- तसेंच हे हल्लेखोर शंकर सुगडे यांच्या 14 टायर अशोक लिलेंड या गाडीवर चालक म्हणून सुग्रीव व बाळू हे दोन महीण्यापूर्वी होते परंतु काही कारणास्तव या दोघांना कामावरून सुगडे यांनी काढले होते या कारणामुळे हे दोघे सुगडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते त्यामुळे कामावरून काढण्याच्या कारणामुळे हा जीव घेणा हल्ला केला आहे असे फिर्यादित म्हटले आहे तसेच पूडील तपास तलवाडा पोलीस स्टेशनंचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके हे करत आहेत.