
वीर (प्रतिनिधी) बीड शहरातील बशीरगंज,भाजी मंडई परिसरात आज सकाळी 11 च्या सुमारास अर्भक आढळल्याने नागरिकांनी याची माहिती शहर पोलिसांना देत पोलिस कर्मचारी अशपाक यांनी भाजी मंडी,बीएसएनएल टॉवर जवळ अज्ञातानी टाकलेले म्रत अर्भक ताब्यात घेऊन हे अर्भक कोणाचे आहे,?कोणी टाकले? याचा शोध शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत असून या अर्भकाच्या मातेचा शोध पोलिस घेत आहेत.भाजी मंडई सारख्या वर्दळीच्या ठिकाणी हे अर्भक आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली.