ताज्या घडामोडी
बार्शी नाक्यावर प्रा.हाके,वाघमारे यांचं स्वागत
भगवान गड ते चौंडी अभिवादन यात्रा दरम्यान सत्कार

बीड ओबीसी आंदोलक,उपोषणकर्ते प्रा.लक्ष्मण हाके व आबासाहेब वाघमारे यांनी उपोषण माघे घेतल्यानंतर राज्यभर अभिवादन यात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही यात्रा बीड शहरातील बार्शी नाक्यावर येताच बार्शी नाका भागातील युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत हाके व वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राजेभाऊ दुधाळ,नितीन पुंड, रामेश्वर राऊत,प्रीतम दुधाळ,अशोक दुधाळ, सचिन बोबडे,भूषण सुरवसे,राहुल भराटे,मंगेश बोबडे,आकाश ढगे,तुषार ढगे सह बार्शी नाकाभागातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.