
वीर (प्रतिनिधी) आष्टी विधानसभा चे माजी आमदार भीमराव धोंडे यांना एका YouTube पत्रकाराने एक कोटीची रुपये खंडणीची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली असून,त्या यूट्यूबल चॅनेलच्या पत्रकारा सह इतर दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भीमराव धोंडे यांची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे असून तुमची बदनामी करू तुमची कारकीर्द संपवून टाकू अशी धमकी देत एक कोटी 25 लाख रुपयाची मागणी धोंडे यांचे पी.ए.जफर शेख यांच्याकडून 25 हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.माजी आमदार धोंडे यांनी या ब्लॅकमेलिंग,खंडणीला कंटाळून अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पत्रकार इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर सह एक महिला,पुरुषा दोघाविरुद्ध तक्रार दिली आहे.