
वीर(प्रतिनिधी)शिवसेना जिल्हा प्रमुख(शिंदे गट)कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली होती.बीड या ऑडिओ क्लिप मध्ये लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा विश्वासघात केल्याचे,बजरंग बाप्पाचे काम केल्याचे तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट रचण्यात आला होता.रात्री कुंडलिक खांडे मागील ३०७ च्या गुन्ह्यात नगर मधून ताब्यात घेण्यात आले त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आज सकाळी शिरूर मध्ये कुंडलिक खांडे यांचा पुतळा जाळून निषेध म्हणून शहर बंद ठेवण्यात आले.याच ऑडिओ क्लिपमुळे कुंडलिक खांडे यांची जिल्हाप्रमुख या पदावरून हाकालपट्टी करण्यात आली.