
आनंद वीर (प्रतिनिधी) कुंडलिक खांडे यांच्या भावकितील ज्ञानेश्वर खांडे हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख या पदावर होता. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्ञानेश्वर खांडे याच्यावर कुंडलिक खांडे व त्याच्या भावासह सात ते आठ जणांनी जीवघेणा हल्ला केला होता ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे खाजगी दवाखान्यात उपचार साठी दाखल केले होते.यातील मुख्य आरोपी कुंडलिक खांडे सह इतर लोकांवर ३०७ चां गुन्हा नोंद झाला परंतु राजकीय वरदहस्त असल्याने त्याला अटक करण्यास पोलिस टाळाटाळ करत होते.परंतु दोन दिवसापूर्वी खांडे ची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण तापले होते.रात्री उशिरा खांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आज न्यायालयापुढे उभे केले असता खांडे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दुपारी त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली.त्यामुळे खांडे यांचे गृह फिरण्याचे दिसत आहे. त्यांना ग्रामीण पोलिस घ्या ताब्यात दिले आहे.