
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांचा यावर वचक नसल्याचे दिसून येते. शहरातील काही भागात तर स्वतः नागरिकच रात्रीची ग्रस्त घालत आहेत.काही दिवसापूर्वी पाच ते सहा जणांचे टोळके सिसी कॅमेरा मध्ये कैद झाले होते.त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी यावर काहीच कारवाई न केल्याने रात्री चोरटे शहरातील विविध भागांमध्ये फिरताना दिसत आहेत.त्यामुळे पोलिसांनी रात्रीची ग्रस्त वाढवावी.अंकुश नगर,धानोरा रोड सह शहरात भीतीचे वातावरण पसरल्यानेेे आज डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी बीड पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.