
आनंद वीर (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील परळी शहरामध्ये आज रात्री नऊ च्या सुमारास गोळीबार झाल्याची माहिती मिळत असून त्यात एक ठार व दोन जखमी झाल्याचे समजते.बबन गीतेचे कट्टर समर्थक माधव गीते यांनी बप्पा आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याने ते ठार झाले असून अन्य दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.गोळीबार करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.या घटनेने परळी शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.