
आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराम मल्टीस्टेट चे चेअरमन सुरेश कुटे,आशिष पाटोदकर यांनी आज शिवाजीनगर पोलिसांनी बीड न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.सुरेश कुटे यांनी नजर कैदेत घरी राहून काम करू द्यावे अशी मागणी न्यायाधीशापुढे केली होती,परंतु सरकारी वकीलाने त्यावर आक्षेप घेऊन द कुठे ग्रुप या नावाने फंड येणार आहेत तर सुरेश कुटे यांना घरी राहण्याची परवानगी देऊ नये असे सांगितले.त्यावर न्यायाधीशांनी आज तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.तसेच बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट सिल का केल्या असे कुटे च्या वकिलांनी विचारले त्यावर नागरिकांनी नुकसान केले असते म्हणून सिल केल्याचे पोलिसांनी सांगितले.