
फोनवर ओटीपी वापरून ईव्हीएम अनलॉक केल्याची प्रसिद्ध केली होती बातमी
शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या एका नातेवाइकाने त्यांचा मोबाइल फोन वापरून ईव्हीएमशी कनेक्ट केल्याचे खळबळजनक वृत्त मिड-डेने प्रकाशित केल्यानंतर काही दिवसांनी, ही प्रकाशन संस्था आणि या आरोपाची री ओढणाऱ्या इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.ऍड. विवेकानंद दयानंद गुप्ता यांनी ‘एक्स’वर माहिती देऊन, त्यांनी मुंबईतील महादंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करून बनावट बातम्यांसाठी वृत्तपत्र आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी केली आहे.मिड-डेचे रिपोर्टर शिरीष वकतानिया यांनी खोटे दावे केल्याचे वकिलाने नमूद केले आहे. तसेच, या दाव्याची री ओढणारे इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार प्रियांका चतुर्वेदी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत, आप समर्थक यूट्यूबर ध्रुव राठी, काँग्रेस नेते सरल पटेल आदींविरोधात तक्रार दाखल केली आहे.भारतीय दंड संहितेच्या कलम १६५ (३) अंतर्गत पोलिसांना या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३४आणि १२०ब सह कलम ५०५ (२) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी याचिकेत मागणी आहे.शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर हे ४ जून रोजी मतमोजणीच्या वेळी मोबाइल फोनचा वापर करून ओटीपी तयार करूनईव्हीएम अनलॉक करू शकले, असे खोटे वृत्त १६ जूनरो जी मिड-डेने प्रसिद्ध केले होते.