
एकीकडे मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीची जय्यत तयारी सुरू आहे. गाव, तांडा, वस्ती, वॉर्डात बैठका घेऊन रॅलीच्या दिवशी घरावर झेंडा फडकवा तर अंगणात रांगोळी काढण्याचे आवाहन अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्याकडून करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे जरांगे दोन समाजांत तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचे काम करत असल्याचा आरोप करत त्यांच्या रॅलीला परवानगी देऊ नका, अशी मागणी ओबीसी नेते पोलिस आयुक्तांकडे करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाएल्गार भव्य शांतता रॅलीला मराठवाड्यात ६ जुलैपासून सुरुवात करणार आहेत. १३ जुलैला छत्रपती संभाजीनगर येथे निघणार रॅली आहे. या रॅलीच्यानियोजनासाठी छत्रपती संभाजीनगर, कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, पैठणसह इतर तालुक्यांमध्ये समन्वयक नेमले आहेत. या रॅलीच्या दिवशी घरासमोर रांगोळी काढा, घरावर भगवा झेंडा फडकवा, रॅलीच्या दिवशी सर्व कामे बाजूला ठेवून रॅलीत सहभागी व्हावे, शांततेच्या मार्गाने रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा समाजाला अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्याकडून करण्यात आले आहे. परंतु, या रॅलीला ओबीसी नेत्यांकडून विरोध करण्यातआला असून रॅलीला परवानगीदेऊ नये,अशी मागणी पोलिसआयुक्तांकडे केली आहे.