
- वीर(प्रतिनिधी) बीड पोलीस दलातील पोलिस निरीक्षक,उपनिरीक्षक यांनच्या कार्यकाळ संपलेल्या व विनंती बदल्या आज सायंकाळी करण्यात आल्या.बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजलेले एक कोटी रुपयाची लाच प्रकरणी स्थानिक गुन्हे आर्थिक शाखेचे हरिभाऊ खाडे यानी जिजाऊ मल्टीस्टेट घोटाळ्यामध्ये मध्ये एका व्यापाऱ्याला आरोपीच्या यादीत नाव येउ द्यायचे नसेल तर एक कोटी रुपयेची लाच मागितली होती त्यामुळे एसीबी ने कारवाई केल्याने पोलीस खाते चांगलेच बदनामी झाले होती.खाडे यांच्या घरी झडाझतीत दोन कोटींचे घबाड सापडले होते.सध्या खाडे हे न्यायालयीन कोठडीत असून देखील त्यांची बदली समजत नागपूर येथे झाल्याचे समजते.