
आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे,पत्नी अर्चना कुटे सह इतरावर 25 लक्ष रुपयाची फसवणूक केल्या प्रकरण पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घाटसावळी येथील रहिवासी मोहन भगवान दराडे यांनी घाटसावळी शिवारातील शेती कारखान्यासाठी अधिग्रहण झाल्याने मिळालेला मोबदला घटसावली शाखा क्र.30 येथील ज्ञानराधा शाखेत जमा केला होता.वेळेवर पैसे परत न मिळाल्याने1)सुरेश ज्ञानोबा कुटे 2)अर्चना सुरेश कुटे 3)उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी 4)शाखा व्यवस्थापक सोमनाथ घोडके5)जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र पोकळे यांच्या विरोधात भा.द.स.420,406,409,34 या कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.कुटे हे सध्या शिवाजीनगर पोलीसाच्या ताब्यात आहेत,कुटे च्या अडचणीत व गुन्हे दाखल होण्यास दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे.