
वीर(प्रतिनिधी)सध्या पावसाचे दिवस असल्याने पर्यटक विविध स्थळी जावून आनंद लुटत आहेत, पावसाची मजा घेत आहेत परंतु हीच मजा एका पुण्यातील कुटुंबाला सजा बनली आहे.पुण्यातील हडपसर भागातील सय्यद नगर मधील हे कुटुंब रविवार सुट्टी असल्याने लोणावळा येथील भुशी डॅम मध्ये गेले असता,वाहत्या पाण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने एकाच कुटुंबातील दुर्दैवाने पाच जण वाहून गेल्याची दुःखद घटना काल दुपारी भुशी डॅम मध्ये घडली.हे पाहून प्रत्यक्षदर्शीचां थरकाप उडाला.