
बीड(प्रतिनीधी)बीड शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असून त्याकडे शिवाजी नगर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने आज शिवाजीनगर येथील माजी नगरसेवक विनोद मुळूक सह या भागातील रहिवासी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे प्रमुखाला निवेदन देण्यात आले.बीड शहरातील शिवाजी नगर,अंकुश नगर, पलवन चौक,गणपत नगर,जिजाऊ नगर,नवीन सरस्वती शाळेकडे जाणारा भाग,सिस्टर कॉलनी,मित्र नगर,धानोरा रोड, दत्तनगर,दिलीप नगर या भागात चोराची धुमाकूळ घातला असून या भागातील नागरिकांनी रात्री जागून स्वतःच ग्रस्त घालत आहे.पोलिसांनी या चोराचा त्यात काय बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.यावेळी नगरसेवक विनोद मुळूक,संतोष घोडके,रोहन गुजर,अशोक घोडके,अश्रूंबा घरत,गणेश कदम सह शिवाजीनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमा झाले होते.