
आनंद वीर (प्रतिनिधी) ओबीसी नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे अवघा महाराष्ट्र पाहतो. पंकजा मुंडे यांना विधान परिषद वर घेऊन मंत्री पद द्यावे अशी सकल ओबीसी समाजासह भाजप कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. लोकसभेमध्ये पराभव झाल्याने चार कार्यकर्त्यांनी आपले जीवन संपवले होते,भाजप नेत्यांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषद घ्यावे अशी मागणी केली होती. त्यामुळे आज पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर त्याने भाजप नेत्यांसह बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण झाले आहे.