ताज्या घडामोडी
ज्ञानराधाचे ठेवीदार आक्रमक,पोलिस अधीक्षक कार्यालयात जमाव
कुटे अटक मग संचालक मंडळ का फरार ?

वीर (प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये गोरगरीब,कष्टकारी, शेतकरी यांनी आपला पैसा ठेवला होता,जास्त व्याजाचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याने गुन्हे दाखल आहेत.आज सुरेश कुटे हे पोलिसांच्या ताब्यात असून संचालक मंडळ,शाखा व्यवस्थापक तसेच अर्चना कुटे फरार असल्याने ठेवीदारांचा पोलिसावर संशय वाढत आहे.त्यामुळे आज ठेवीदार पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी जमा झाले होते. पोलीस आणि कुटे यांची मिलीभगत असल्याचे काही ठेवीदरांनी बोलून दाखवले.