ताज्या घडामोडी
बबन गीते च्या पाठीशी राष्ट्रवादी पवार गट
बबन गीते सह इतरांवर गुन्हा दाखल,आरोपीचा शोध सुरू

बीड जिल्ह्यातील परळी लगत असलेल्यास मरगळवाडीच्या सरपंचांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राज्य उपाध्यक्ष बबन गीतेंसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला.आरोपींना अटक करण्यासाठी काल परळी पोलीस ठाण्यासमोर ती आंदोलन केले होते. हत्तीच्या घटनेनंतर अजित पवार गटाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावर आता शरद पवार गटाचे नेते देखील बबन गीतेंच्या मदतीसाठी सरसावले आहेत.आम्ही पक्ष म्हणून बबन गीते यांच्या पाठिशी आहोत,संपूर्ण प्रकरणाची चौकशी योग्य अधिकाऱ्याकडून व्हावी,कारण यात काही संशयास्पद घटना घडल्या असून विरोधकांकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बबन गीतेंना मुद्दाम अडकवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड व रोहित पवार यांनी केला आहे.