
वीर(प्रतिनिधी) केज तालुक्यातील रहिवाशी राजेश घुले हे पुण्याहून टाकळी गावाकडे येत असताना साळेगाव फाट्याजवळ असलेल्या पोद्दार इंग्लिश स्कूलच्या समोर कार आली असता अचानक कारणे पेट घेतला प्रसंगावधान राखून चालकाने कार रस्त्याच्या बाजूला घेत प्रवाश्याना खाली उतरल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने कार जाळून खाक झाली.