
वीर(प्रतिनिधी)महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचे जाहीर केले.या योजनेसाठी अंतिम तारीख 15 जुलै ठेवण्यात आली होती,कागदपत्र पूर्तता व महिलांची वाढती गर्दी पाहता या योजनेला मुदत वाढ दिली आहे.आता दोन महिने वाढ करून महिलाना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यात येणार आहे.1)या योजनेतील पाच एकर ची अट रद्द करण्यात आली आहे.2)महिला वयोमर्यादा 21वर्ष ते 60 होती ती 65 वर्षे करण्यात आले आहे.3) ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आले आहे.असे बरेचं बदल या योजने मध्ये करण्यात आले आहेत.