ताज्या घडामोडी
शहरातील अनधिकृत होर्डिंग ला अभय कोणाचे?
दुर्घटना झाल्यावरच होर्डींग लावनारावर कारवाई करणार,काढणार का?

बीड शहरात अनेक ठिकाणी,इमारतीवर अनधिकृत होर्डिंग्ज,बॅनर आहेत.ते विनापरवाना आहेत याची माहिती असून देखील नगरपालिका ना कर वसूल करते ना कारवाई करते.मागील महिन्यात मुंबई येथे अशीच एक होर्डिंग कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.त्यानंतरच अनधिकृत होर्डिंग लवणारवर कारवाई करण्यास सुरुवात झाली होती.बीड नगरपालिका प्रशासन देखील होर्डिंगमध्ये शहरात एखादी दुर्घटना होण्याची,नागरिकाचे जीव जाण्याची वाट पाहत आहे का.?असा प्रश्न शहरवासीयांना पडला असून मुख्य रस्त्याच्या बाजूला,इमारतीवर अनधिकृत होर्डिंग्ज व मुख्य रस्त्यात व चौकातील विद्युत खांबाला लावलेले बॅनर काढून लावणारवर कारवाई करावी.