
वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेट चे चेअरमन सुरेश कुटे यांनी ठेवीदारांचे पैसे वेळेवर न मिळाल्याने काही ठेवीदारांनी सुरेश कुटे,अर्चना कुटे,आशिष पाटोदकर व संचलक मंडळ यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सुरेश कुटे व आशिष पाटोदकर हे शिवाजी नगर पोलिसाच्या ताब्यात आहेत.बीड पोलिस उपअधीक्षक गोल्डे यांनी आज ठेविदाराची भेट घेऊन सांगितले की कुटे यांचा कोणताही फंड येणार नसून त्यांनी सर्वांची फसवणूक केली आहे.त्यामुळे ठेविदारामध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून कुटे यांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे पैसे द्यावे अशी मागणी आज ठेवीदारांनी पोलिस उपअधीक्षक यांनच्याकडे केली.