ताज्या घडामोडी
शांतता रॅलीस मोठ्या संख्येने सामील व्हा. सप्नील गलधर
शांतता रॅलीस जरांगे पाटील यांची उपस्थिती

वीर (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाकडून 11 जुलै गुरुवार रोजी बीड शहरात शांतता रॅली चे आयोजन करण्यात आले असून ही शांतता रॅली महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये निघणार असून सकाळी 10 वाजता बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीची सुरुवात होणार आहे व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ सांगता होणार आहे. सध्याचे वातावरण हे जाती जाती मध्ये दुरावा करणारे झाले असून सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र रहावे व सामाजिक एकोपा जपावा यासाठी ही शांतता रॅली कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्यासाठी नसून सामाजिक शांतता,सलोखा रहावा म्हणून आहे.या रॅलीत सर्व समाज बांधवांनी सामील व्हावे असे आवाहन युवा नेते स्वप्नील गलधर यांनी केले आहे.