जिल्हाधिकाऱ्याचा वाळू माफियाला दणका या अधिकाऱ्याला केले निलंबित

किरण दांडगे तलाठी व पुरुषोत्तम आंधळे निलंबित ०३.०७.२०२४ रोजी राक्षसभुवन ता. गेवराई येथील वाळूघाटाची पाहणी केली असता असे आढळून आले तेथे मोठया प्रमाणात अवैद्यरित्या वाळूचे उत्खनन झाले आहे वाळूच्या अवैद्य उत्खननावर लक्ष ठेवणे ही तलाठी / मंडळ अधिकारी यांची प्राथमिक जवाबदारी असताना त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यात अक्षम्य दिरंगाई केली आहे. त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील श्री. किरण प्रभाकर दांडगे, तलाठी सज्जा राक्षसभुवन ता. गेवराई जि.बीड हे शासकीय कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष, कर्तव्यात सचोटी, न राखणारे निष्काळजीपणाचे व जाणून बुजुन टाळाटाळ करणारे आहे असे दिसून आले असेही आदेशीत करण्यात येते की श्री. किरण प्रभाकर दांडगे, तलाठी सज्जा राक्षसभुवन ता. गेवराई जि. बीड यांना निलंबन कलावधीत मुख्यालय तहसील कार्यालय अंबाजोगाई हे राहील व सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय त्याना मुख्यालय सोडता येणार नाही. किरण प्रभाकर दांडगे, तलाठी सज्जा राक्षसभुवन ता. गेवराई जि. बीड यांना निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहन अवधी स्वीयेत्तर सेवा निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ चे नियम६८ मधील तरतुदीनुसार निलंबन करण्यात आले