परळी गोळीबार,हत्या प्रकरणी वेगळे वळण
वाल्मीक अण्णा कराड सह 15 ते 20 जना विरोधात गुन्हा दाखल

वीर(प्रतिनीधी)परळी शहरात काही दिवसापूर्वी मरळवडीचे सरपंच बाप्पू आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.त्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते सह इतरांवर३०७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.काल परळी बंद ठवण्यात आली होती.या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले असून महादेव गीते यांनी परळी शहर ठाण्यात तक्रार दिली आहे की वाल्मीक अण्णा यांच्या बंगल्यावर बोलवल्यावंर का आला नाहीस?म्हणून 15 ते 20 जणांनी महादेव गीते यांच्या घरी येऊन शिवीगाळ करत घरासमोरील स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली.महादेव गीते हे घराच्या बाहेर येतात जीवे मारण्याच्या उद्देशाने पोटावर बंदुकीने फायर करत हातावर कोयत्याने वार करण्यात आला.या प्रकरणी बाप्पू आंधळे(मयत), राजेश फड,रघुनाथ फड, गोट्या गित्ते,वाल्मीक अण्णा कराड यांनच्या सह 15ते20 जनावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.