ताज्या घडामोडी
बीड शहरात संशयित चोर महिला पकडल्या
चोरांचे टोळके फिरत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण

वीर(प्रतिनिधी)बीड शहरात काही दिवसात चोरीच्या प्रमाणत वाढ झाली असून अंकुश नगर,धानोरा रोड,शिवाजी नगर,दिलीप नगर,कालिका नगर,पालवन चौक सह शहरात विविध भागात चोरटे कोणत्या ना कोणत्या भागात सी सी कॅमेऱ्यामध्ये कैद होत असल्याने शहरात नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे रात्रीची ग्रस्त वाढवावी यासाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यात जमा होऊन निवेदनात मागणी करत आहेत.आज पाच वाजन्याच्या सुमारास बहिरवाडी,हनुमान नगर रामतीर्थ भागात काही संशयित महिलांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या पेठ बीड पोलिस ठाणे प्रमुख मोदिराज यांनी चौकशी केलि असता त्या चोर नसून नक्षीकाम, करणाऱ्या महिला आहेत हे चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्याने महिलाना सोडून देण्यात आले.