
वीर( प्रतिनिधी)बीड तालुक्यातील मांजरसुंबा या गावांमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास गावातील इंगोले यांनी सर्पमित्रांना कॉल करून माहिती दिली की घराच्या बाजूला भला मोठा साप असून तो शेळ्यांच्या कळपाकडे जात असल्याने त्याला मारू का?त्यावर सर मित्र सांगितले की सापांना मारू नका आम्ही येत आहोत,रात्री एक वाजता सर्पमित्र दीपक वाघमारे, नागसेन ओव्हाळ विशाल मिसळे,अजय डाके,जयदीप धुरंधरे यांनी मांजरसुंबा गावाजवळ शेती वस्तीमध्ये जावून पाहिलं तर भला मोठा एक अजगर निदर्शनास आला,तो आजगर शेळीच्या कळपात गेला असता तर शेळ्यांना फस्त केले असते.सर्पमित्रांना वेळीच जाऊन शेळ्यांना तर वाचवलच परंतु अजगरला सुद्धा जीवदान दिले. आज घरला पकडून इमामपुर जवळील फॉरेस्ट मध्ये सोडण्यात आले. आपल्या भागात साप दिसल्यास सर्पमित्रांना कळवा.9834142405