
वीर(प्रतिनिधी) शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणात आरोपात नाव असल्याने त्यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात 307 गुन्ह्य दाखल करण्यात आला होता.गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातून खांडे यांना पोलिसानी ताब्यात घेतले होते,सहा दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.यावेळी न्यायालय परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.