ताज्या घडामोडी

छेडछाड प्रकरणी न.प.कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

न.प.कर्मचारी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ

बीड-मित्राने मित्राच्या बायकोवर नजर ठेवून सातत्याने तिची जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिच्यावर जबरदस्ती केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात (दि.५) रात्री बीड नगरपरिषद कर्मचारी अमोल शिंदे रा.शिवाजीनगर बीड  याच्या विरोधात ३५४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.अमोल शिंदे आणि त्याचा मित्र दोघेही बीडच्या नगरपालिकेतील नौकरीला आहेत.अमोल नगरपालिकेत लिपिक असून मागच्या काही दिवसांपासून तो मित्राच्या बायकोवर वाईट नजर ठेवून होता.त्याने तीन वर्षांपूर्वी पिडीतेसोबत एका कार्यक्रमात फोटो काढत असताना तिची छेड काढली होती.यावेळी पीडितेने घडलेला प्रकार उपस्थिती नातेवाईकांना सांगितल्यानंतर अमोलने सर्वांची माफी मागून असा प्रकार पुन्हा घडणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे याप्रकरणात तीन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र २६ जून रोजी पीडिता आपल्या मुलाला शाळेतून घेऊन येत असताना भाजी मंडईत अमोलने तिला अडवून ‘मला तू खूप आवडतेस, मला तुला बोलायचे आहे म्हणत’ अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच पीडीतेचे काही फोटो अमोलने दाखविततिला’ ब्लेकमेल करण्याचा प्रयत्न केलाव तू मला बोलली नाहीस तर तुझ्यानवऱ्याला मारून टाकीन अशीहीधमकी दिली. यावेळी पीडितेने नकारदेत तेथून पळ काढला होता. मात्र ५ जुलै रोजी पुन्हा पीडिता आपल्या मुलाला शाळेतून घेऊन जात असताना भाजी मंडईमध्ये अमोलने तिला अडवून हाताला पकडत जवळ ओढले व तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी पीडितेने भाजी मंडईतच जोराने आरडाओरड केल्यानंतर अमोल शिंदे येथून पळून गेला. रात्री उशिरा याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसपुढील तपास करीत आहेत.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button