
वीर(प्रतिनिधी) मराठा संघर्ष योद्धा म्हणून आज जरांगे पाटील यांच महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. कुणबी प्रमाणपत्र तसेच सगे सोयरे याची अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारला एक महिन्याचा अवधी दिला होता तत्पूर्वी मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात शांतता रॅली घेण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे.त्याचीच सुरुवात म्हणून आज हिंगोली शहरातून या शांतता रलीची सुरुवात करण्यात आली.या रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने सकल मराठा समाज सामील झाला असून जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे.