ताज्या घडामोडी
बीड सायबर पोलिसाची उल्लेखनीय कामगिरी.
बीड पोलिसांनी मध्यप्रदेशातून पाच भामट्याना ताब्यात घेतले

वीर(प्रतिनिधी)बीड पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व सायबर पोलिस निरीक्षक डी.बी.गात, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश जोगदंड , पोलीस कर्मचारी विजय घोडके, प्रदीप वायभट, अजय जाधव या पोलिस पथकाने बीड येथील एकाला फोरेक्स मार्केटिंग गुंतवणूक करून जास्तीचा नफा मिळवून देतो असे सांगून 57 लाख 20 हजार रुपयांची ऑनलाइन फसवून केल्याने 5 जानेवारी रोजी सायबर शाखेत गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्याप्रकरणी बीड सायबर पोलिसांनी तपासाची चक्री गतिमान करून मध्यप्रदेश मध्ये जावून पाच आरोपी अटक करून त्यांच्याकडून स्वाईप मशीन,अनेक एटीएम कार्ड, लॅपटॉप मोबाईल जप्त करण्यात आले.बीड पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस पुढील दलाची मान उंचावली आहे.