
वीर(प्रतिनिधी)बीड तालुक्यातील बोरखेड गावातील इस्माईल सत्तार तांबोळी याने ऊसतोडी संपल्यावर गावात पम्मरचे दुकान चालू केले होते.ऊसतोडीची उचल बाकी असल्याने मुकादम व काही लोकांनी त्याच्या दुकानावर जाऊन पैशाची मागणी केल्याने बाचाबाची झाल्याचे गावातील नागरिकांनी पाहिले होते.त्यानंतर त्याला लिंबागणेश येथील एका धाब्याच्या मागे नेऊन ठार मारल्याचे सांगण्यात येते.सायंकाळी महीला शेतामधून परतत असताना काही मृतदेह पाहिला असता आरडा ओरड करत जवळ असलेल्या पंप चालकालां सांगून याची माहिती नेकनुर पोलिसांना दिल्यावर पोलीसानी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असता म्रत बोरखेंड येथील असल्याची माहिती मिळाली असून इन कॅमेरा शिवविच्छेदनासाठी मृतदेह आंबेजोगाईला पाठवण्यात आला.दिवसाढवळ्या खून झाल्याने एकच खळबळ उडाली.याप्रकरणी इब्राहिम तांबोळी यांच्या फिर्यादीवरून तिघा विरोधात निघून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या खुनाचा तपास पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोसावी करत आहेत.