ताज्या घडामोडी
पोलीस उपनिरीक्षक अपघातात ठार तर एक गंभीर जखमी,अपघाताचा व्हिडिओ कॅमेरात कैद
पोलीस भरती बंदोबस्तसाठी जाताना अपघात

वीर (प्रतिनिधी)बीड शहरात पोलिस भरतीची आज लेखी परीक्षा असल्याने सकाळी सातच्या सुमारास बंदोबस्तासाठी बीडकडे येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाच्या दुचाकीला नेकनूर जवळील कालिका मंगल कार्यालयासमोर एका कारने जोराची धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र नन्नवरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बीड शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर उपचार दरम्यान मृत्यू झाला असून माघें बसलेले पोलीस उपनिरीक्षक रमेश नागरगोजे हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.