ताज्या घडामोडी
जिल्हाधिकारी कार्यालयातील सागवानाची झाडे अवैद्य रित्या तोडली
परवानगी नसताना तोडली सागवानाची झाडे

आनंद वीर (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी कार्यालयातील कंपाऊंडच्या 15 फूट आत असणारी सागवांची झाडे विक्रीसाठी अवैद्यरित्या तोडली आहेत.सागवानाची झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते परंतु विक्रीच्या उद्देशाने लाखो रुपयांची सागवानाची झाडे सादेक नामक गुत्तेदारने व्यक्तीने तोडले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातच दिवसाढवळ्या सागवानाच्या झाडाची कत्तल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी पोहोचले असून सदर लाकडांचा पंचनामा चालू आहे.सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे, योगेश भागवत, पंकज बाहेगव्हाणकर, राजू शहाणे यांनी सागवानाचे झाड तोडण्यापासून गुत्तेदारास रोखले.